आता ब्ल्यू टिकसाठी वापरकर्त्यांच्या करावे लागणार पैसे खर्च !

 

इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे.आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी ट्विटरवर ब्लू टिक सबक्रिप्शनचा ऑप्शन येणार आहे. त्यामुळे आता ट्विटरच्या कमाईचा आणखी एक मार्ग वाढणार आहे, तर ब्लू टिक वापरणाऱ्या वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

एका अहवावरुन ही माहिती समोर आली आहे. ब्लू टिक मिळाल्यानंतर सदस्यता घेण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी आहे, अन्यथा वापरकर्त्यांना त्यांचे ब्लू टिक गमवावे लागेल.ट्विटरसाठी अब्जाधीश मस्कने शेअर्स विकले, कर्जही काढले तसेच पहिल्याच दिवशी सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी किती

७ नोव्हेंबरपर्यंत हे फीचर सुरू करण्याची मुदत दिली आहे, असं या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना रविवारी ३० ऑक्टोबरला सांगण्यात आले आहे. अन्यथा त्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. ट्विटर, जगातील सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ताब्यात घेतल्यानंतर, इलॉन मस्क यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे की, ट्विटर व्हेरिफिकेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी काम करत आहे.

आता ट्विटवर ब्लू टिकसाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत. हे पैसे एकदा नाहीतर प्रत्येक महिन्याला भरावे लागणार आहेत. यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. आता यूजर्ंसना प्रति महिना १९.९९ डॉलर जवळपास १६४६ रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला भरावे लागणार आहेत, त्यामुळे आता ब्लू टिक वापरणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Team Global News Marathi: