मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्रास जाणवून लागल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे ते हॉस्पीटलमध्ये तपासणी आले असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार असून त्या दिवशी छोटी शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
Kind attention
Our party president Sharad Pawar saheb was feeling a little uneasy due to a pain in his abdomen last evening and was therefore taken to Breach Candy Hospital for a check up.
Upon diagnosis it came to light that he has a problem in his Gall Bladder.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 29, 2021
दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पश्चिम बंगाललाही प्रचाराला जाता येणार नाही. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी शरद पवार जाणार होते. पण आता प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला आहे.