मोठी बातमी | शरद बोबडे मोहन भगवंताच्या भेटीला तब्बल तासभर झाली चर्चा

 

नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागव आणि माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची भेट झाली. शरद बोबडे यांनी आएसएसच्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचे सांगितले जात असून, नेमका भेट कोणत्या मुद्द्यावर झाली याचे कारण गुलदस्त्यात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल काही माहिती नसल्याचे म्हटले आहे. मात्र, महल परिसरातील आरएसएस मुख्यालयात संध्याकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान बैठक झाली, असे सांगितले जात आहे. या दोघांमध्ये तासभर नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच सरसंघचालक मोहन भागवत किंवा माजी सरन्यायाधीश बोबडे या दोघांकडूनही या बैठकीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, माजी सरन्यायाधीश बोबडे हे मूळचे नागपूरमधील आहेत. बोबडे यांनी अनेक वर्षे नागपूरमध्ये वकिली केली होती. शरद बोबडे या वर्षाच्या सुरुवातीला देशाचे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते त्यांचा पूर्ण वेळ दिल्ली आणि नागपुरात घालवत आहेत, असे सांगितले जात आहे.

Team Global News Marathi: