‘त्या’ लिस्टमधला १२ वा खेळाडू जितेंद्र आव्हाड; किरीट सोमय्यांचा जाहीर दावा

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि किरीट सोमय्या हे आघाडी सरकार आणि आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आर करताना नेक्ड दिसून आले आहेत. तसेच त्यांच्या आरोपांमुळे आघाडीच्या अडचण सुद्धा वदलेल्या दिसून आल्या आहेत. त्यात सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील ११ घोटाळेबाजांची नावं जाहीर केली होती. आज सोमय्यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.

ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू कोण आहे? असा सवाल सोमय्यांना करण्यात आला. त्यावर लिस्टमधला १२वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असं मोठं विधान सोमय्या यांनी केलं आहे.

दरम्यान सध्या ईडीच्या ससेमिऱ्यात अडकलेले परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पहिली तक्रार मीच दिली होती असेही सोमय्या यांनी सांगितले. परब यांच्या मर्जीतील अधिकारी बजरंग खरमाटे यांचीही चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना लपवून ठेवेले. असा आरोप त्यांनी केला. आता सोमय्या यांच्या आरोपांना आव्हाड काय उत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: