मोठी बातमी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यातच आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मागच्या १० दिवसांपासून गायब असलेल्या अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्याची चौकशी केली जाणार आहे. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे. चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्याने संशय अधिक दाट होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. याप्रकरणात एकूण तीन पथकं चौकशी करत आहेत. याअगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही, आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलीस दप्तरी आहे.

Team Global News Marathi: