कोरोना लस सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘या’ तारखेला बाजारात उपलब्ध होणार

सध्या संपूर्ण देशभरात वैद्यकीय कर्मचारी यांना क्रमाने कोरोना लस देण्यात येत आहे. मात्र सर्व सामान्य नागरिकांना लस कधी देण्यात येणार तसेच ही लस सामान्य नागरिकांसाठी बाजारात कधी उपलब्ध होणार असा प्रश्न विचारला जात होता.

मात्र या प्रश्नाला आता नवी दिल्लीतील एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी उत्तर दिले आहे. या वर्षातच सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, “प्राधान्यानं ज्यांना लस दिली जाते आहे, त्यांचे लसीकरण झाल्यानंतर आणि लशीच्या मागणीइतकाच पुरवठा होत असेल तेव्हा कोरोना लस बाजारात उलब्ध करून दिली जाईल. कदाचित याच वर्षाच्या अखेरला किंवा त्याआधीच हे शक्य होईल अशी आशा आहे.

तसेच जूनपर्यंत ३० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. यामध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी, दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर २७ कोटी ५० वर्षांपेक्षा जास्त नागरिकांचा समावेश आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं आहे. सध्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाते आहे.

Team Global News Marathi: