मोठी बातमी पंकजा मुंडे दिल्लीला रवाना , राजकीय घडामोडींना वेग |

 

मुंबई | दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाच्या विस्तारात आयारामांना संधी देण्यात आलेली असून पक्षातील नेत्यांना डावलण्यात आले होते. याच मुद्द्यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे नाराज असल्याचे बोलून दाखविले जात होते. त्यातच पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषेद घेऊन सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चेला पूर्णविराम दिले होते.

मात्र त्यातच आता पंकजा मुंडे या दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे आज सकाळी दिल्लीला रवाना झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच पंकजा दिल्लीत पोहोचणार आहे. नियोजित बैठकांसाठी जात असल्याचं पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. पण प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचं उघड झालं आहे. मात्र या बैठकीत प्रीतम मुंडे न मिळालेल्या मंत्रिपदाबद्दल दिल्लीतील नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: