“मंदिराचे दार येत्या आठ दिवसांत उघडा” या मागणीसाठी भाजपचे राज्यभरात आंदोलन

 

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाच्या मुद्द्यावर आद्यपही मंदिरे उघडण्यासाठी अपर्वांगी देण्यात आले ली नाही. याच पार्श्वभूमीवर आता इरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. करोनाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरे प्रदीर्घकाळापासून बंद असलेली मंदिरे येत्या आठ दिवसांत भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठीच आज भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसेच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. तर पुण्यात राज्यातील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे.

तर नाशकातही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं आहे. रामकुंड इथल्या मंदिरात शंखनाद आंदोलन करण्यात आलं आहे.यासोबतच मुंबई, शिर्डी, औरंगाबाद, बुलडाणा आणि अमरावतीसह राज्यभरात भाजपाकडून घंटानाद आणि शंखनाद आंदोलन केले जात आहे. तसेच मुंबईत बाबुलनाथ मंदिराजवळ आंदोलन छेडण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: