तर कुलूप तोडून लोक मंदिरे सुरु करतील, चंद्रकांत पाटलांचा आघाडीला इशारा

 

मुंबई | राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असताना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही मंदिराचे दारे उघडण्यात आलेली नाहीत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाने आंदोलन छेडले आहे. आज भाजपकडून आज संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.

तसेच पुण्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंखनाद आंदोलनात भाग घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जर सरकार मंदिरं सुरू करणार नसतील तर आम्हालाच मंदिरे सुरू करावी लागतील. आजपासून लोक भावना दाबून ठेवणार नाहीत. कुलूप तोडून लोक मंदिरं खुली करतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आधी आंदोलकांना संबोधित केलं. त्यानंतर पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी ठकरे सरकारवर घणाघाती टीका केली. मी इशारा देतो आज दिवसभरात मंदिर उघडा. नियम करून का होईना मंदिरं उघडली नाही तर आजपासून लोक त्यांच्या भावना काबूत ठेवणार नाहीत. ते मंदिरांचे कुलुपं तोडून मंदिरात घुसतील. उद्धवजी होश मे आओ, होश मे आकर बात करो, महाराष्ट्रातील पाच पंचवीस लाख लोकं असतील ते देव मान नाहीत. पण मंदिर सुरू न करता इतरांचे शाप तुम्ही घ्याल. आज संध्याकाळपर्यंत मंदिर सुरू करा, असं आवाहन पाटील यांनी केलं.

Team Global News Marathi: