मोठी बातमी | गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव, सत्यजितसिंह पाटणकर विजयी

 

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. पाटण येथून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर इतकी मते घेऊन विजयी झाले आहेत. शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी ५८ मतांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे.

पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ एकूण मते – १०३ झालेली मते – १०२ वैध मते – १०३ अवैध मते – 000 उमेदवार आणि मिळालेली मते शंभूराज देसाई – ४४ मते सत्यजितसिंह पाटणकर – ५८ मते सत्यजितसिंह पाटणकर ५८ मते मिळवून विजयी पाटण येथून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर इतकी मते घेऊन विजयी झाले आहेत.

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी ५८ मतांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. तर ज्ञानदेव रांजणे विजयी झाले आहेत. पहिलाच निकाल हा धक्कादायक असल्याचं समोर आलं आहे. या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Team Global News Marathi: