‘द कश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

 

मुंबई | सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यावर भाष्य केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शरद पवार म्हणाले की,‘काश्मिरमध्ये जे काही घडलं आणि जे सध्या दाखवले जात आहे त्यामध्ये फरक आहे. त्यावेळी देशाचे नेतृत्व हे काँग्रेसकडे नसून विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याकडे होते. भाजपच्या पाठबळामुळेच या कालावधीत मुफ्ती मोहमम्मद सईद हे देशाचे गृहमंत्री झाले होते असे पवार म्हणाले.

तसेच त्यावेळी जम्मू-काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट होती. तसेच तेथील राज्यपालही काँग्रेसच्या विचारांचे नव्हते’, त्याचप्रमाणे समाजामध्ये पुन्हा दुरावा निर्माण होईल अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करणे टाळायला हवे, असेही पवार यावेळी म्हणाले.

Team Global News Marathi: