औरंगाबादमध्ये संजय राऊतांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा, कोरोनाच्या नियमांना केराची टोपली

 

औरंगाबाद | देशात वाढत्या महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महागाई विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत निघणार आक्रोश मोर्चा. महागाईविरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. आपला आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, त्यामुळं रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची गरज आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळं देशात १७ हजार व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आमचा आक्रोश हा अन्यायाविरुद्ध आहे. ही एक प्रकारची निजामशाही आहे. हा महागाईचा हल्ला अन्यायकारी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यात आपलं सरकार आहे पण सरकारला काम करुन द्यायचं नाही. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स नेत्यांच्या दारी पाठवून नाकेबंदी केली जात आहे, असं ते म्हणाले. केंद्राकडून राज्याची आर्थिक कोंडी केली जात आहे. सामान्य लोकांचा संबंध नसलेल्या गोष्टी समोर आणून भरकटवण्याचं काम सुरु आहे, असं ते म्हणाले. राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा दंगली भडकावून राज्याला आग लावायची आणि मग सांगायचं की ह्यांना राज्य करता येत नाही, राज्य सरकार बरखास्त करा, असे कारस्थान राज्यातल्या विरोधी पक्षाने चालवला आहे. याला केंद्र सरकारची साथ आहे. या सर्वांना औरंगाबादचा आक्रोश मोर्चा हा एक इशारा आहे, असं राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: