मोठी बातमी | भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांची नोटीस

 

महाराष्ट्रातील भाजपचे चार केंद्रीय नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. भाजपच्या वतीने देशभर हा कार्यक्रम आखला गेला आहे. मात्र आजपासून मुंबईतनव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागणार आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत. नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहे. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सर्वनाचे लक्ष लागून राहिले आहे.

राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांना आम्ही स्मृती स्थळावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतलीय. तर स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घेणार असल्याचा निर्धार राणेंनी केलाय.

Team Global News Marathi: