बिग ब्रेकिंग..! राज्य मंत्रिमंडळाने घेतला “हा” निर्णय –

मोठी बातमी..! राज्य मंत्रिमंडळाने घेतला “हा” निर्णय –

मुंबई : राज्यात पूर्ण लॉकडाउन नसला तरी अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात दर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे, अशी माहिती राज्याचे अल्प संख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

राज्यात कडक लॉकडाउन घेण्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. यामध्ये आठवड्यातील पाच दिवस कडक निर्बंध तर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत रोजगार व अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. त्या बरोबर लॉकडाउन संदर्भात नियमावली उद्या रात्री आठ वाजता जारी करण्यात येणार आहे असे नवाब मलिक यांनी सांगितले.

★ कसे असेल नियमावली?

● शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन

● लोकल ट्रेन सुरू राहणार

● जिम बंद होणार

● अत्यावश्यक सेवांना परवनगी

● रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार

● अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी

● रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

● धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील

● सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत बंद

● गार्डन, मैदाने बंद

● जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला

● सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही

● रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक

● बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल

● टॅक्सीत मास्क बंधनकारक

ग्लोबल न्युज नेटवर्क: