मुंबईतील पोलीस इमारतीच्या बांधकामांना गती द्या, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे आदेश

मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये जिल्हा विकास निधीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाणे इमारतींच्या बांधकामाचा आढावा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी घेतला होता. ते स्वतः या बैठकीला उपस्थित होते. यावेळी नी संबंधित पोलीस ठाण्यांच्या इमारतींच्या कामांना गतिमान करण्याचे आदेश त्यांनी संबंधित खात्यांना दिले आहेत.

तसेच पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामातील अडचणी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने सोडवाव्यात आणि हे काम अधिक गतिमान पद्धतीने करावे असे यावेळी त्यांनी बैठकीत बोलून दाखविले होते. त्यामुळे लवकरच मुंबईतील पोलीस स्थानकांच्या इमारतींचं कायापालट होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वाकोला, मेघवाडी, गोरेगाव आणि मालाड पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामाकरिता ३७.९५ कोटी रुपयांचा निधी मान्य करण्यात आला आहे. यापैकी ८ कोटी रुपयांचा निधी राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांना वर्ग करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Team Global News Marathi: