Big Breaking: मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहीर

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

 

दरम्यान विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्याने मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी 6 महिन्यात पोटनिवडणूक घेण्यात येणार होती.

 

त्यानुसार आज निवडणूक अयोगाने पंढरपूर ची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान विधानसभा पोटनिवडणूकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून कै.आमदार भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर आहे तर दुसरीकडे समाधान आवताडे,शैला गोडसे,प्रशांत परिचारक, अभिजित पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

येत्या काही दिवसात कोण कुणाच्या विरोधात उमेदवार असणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

पोटनिवडणूक जाहीर होताच मतदारसंघात आचारसंहिता लागू झाल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: