ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन !

ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर :- माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता कोरोनाचे निदान झाले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे आज पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झालं.

काल त्यांचा कोरना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना श्वास घेण्यास जास्त त्रास होत असल्याने काल दुपारपासूनच त्यांना दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

 

मात्र उपचार सुरू असताना आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळेस भारतीय जनता पार्टी कडून खासदार म्हणून निवडून आले होते. तर 2003 ते 2004 दरम्यान केंद्रातील भाजप सरकार मध्ये जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला.ते बार्शीतील चांदमल गुगळे यांचे जावई होते.त्यामुळे त्यांचा बार्शी करांशी स्नेह होता.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: