Big Breaking | उद्धव ठाकरेंना मोठा झटका !;एकनाथ शिंदेंना गटनेते तर गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता

Big Breaking | उद्धव ठाकरेंना मोठा झटका !;एकनाथ शिंदेंना गटनेते तर गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता

मुंबई : राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांनी दिली आहे. ( shivsena Political Crisis News In Marathi)

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या पक्षातर्फे शिंदेवर मोठी कारवाई केली होती. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवलं होतं. त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती.

त्यानंतर राज्य विधिमंडळाने देखील अजय चौधरी यांच्या गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: