Big Breaking – अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सोपवला असून त्यांनी तो मंजूर केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही दिवस उरलेले असताना अजित पवारांनी एकाएकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांनी स्वत: हरिभाऊ बागडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा राजीनामा दिला होता. मात्र अध्यक्ष कार्यालयात नसल्याने त्यांनी हरिभाऊ बागडे यांना स्वत: फोन करून तत्काळ राजीनामा मंजूर करा अशी विनंती केल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी देखील होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी यायाबत बोलताना अजितदादांनी का राजीनामा दिला आम्हाला समजले नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. थोड्याच वेळात ते पुण्यात पत्रकार परिषदे घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: