अजितदादांच्या राजीनाम्याचे गूढ कायम, सभापती बागडेंना म्हणाले आधी राजीनामा स्वीकारा कारण …

मुंबई : ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी खेळलेली ईडी कार्यालयाला भेट देण्याची खेळी संपत नाही तोच राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या या पावलाबाबत राष्ट्रवादीचे पदाधिकारीही अनभिज्ञ आहेत. 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे हे सध्या शरद पवारांसोबत आहेत. शरद पवार ईडीच्या कार्यालयाला भेट देण्याचे रद्द झाल्यानंतर पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी मुंबईतून रवाना झाले. मात्र, अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत काकडेंनाही माहिती नव्हते. काकडेंनी अजित पवारांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवारांचा फोन नॉट रिचेबल लागत होता. म्हणून त्यांनी अजित पवारांच्या पीएला फोन केला. मात्र, पीएलाही पवारांचा फोन लागत नव्हता. 

शरद पवारांची सायंकाळी 8 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्येच राजीनामा नाट्याबाबत खुलासा होण्याची शक्यता असल्याचे समजते. 

अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी फोन केला होता. आज सायंकाळी कार्यालयात येऊन राजीनामा दिला होता. फोनवर हरीभाऊ बागडेंनी अजित पवारांना राजीनाम्याचे कारण विचारले होते. मात्र, त्यांनी आधी राजीनामा स्वीकारा नंतर कारण सांगतो असे म्हटले होते. 

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: