धक्कादायक | ओमिक्रॉनच्या भीतीमुळे चीनमध्ये गर्भवती महिला, मुलांना मेटल बॉक्समध्ये केलं कैद 

 

 

सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला असून रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असलेले चित्र दिसून येत आहे. तसेच कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये सुद्धा पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फैलताना दिसून येत आहे. अशातच आता चीनमधून एक भयानक चित्र समोर येत असून संपूर्ण जगभरातून संतापाची लाट उसळली आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, चीनने मोठ्याप्रमाणात क्वारंटाईन कँपचे नेटवर्क बनवले आहे. जिथे हजारोच्या संख्येत मेटल बॉक्स बनवले आहेत. यामध्ये गर्भवती महिला, मुलांसह लोकांना आयसोलेट केले जात आहे. चीनच्या अनयांगसह काही शहरांमध्ये हा लॉकडाऊन लागू केला असून दोन कोटींहून अधिक लोकं या कडक लॉकडाऊनमध्ये कैद झाले आहेत. सध्या चीनच्या ‘झिरो कोविड पॉलिसी’ अंतर्गत खूप कठोर निर्बंध लादले जात आहेत.

 

कोरोनाच्या महामारीच्या सुरुवातीला वुहान आणि हुबेई प्रांताच्या काही भागांमध्ये असे कठोर निर्बंध लागू केल्यानंतर आतापर्यंतचा हा चीनमधला सर्वात कठोर लॉकडाऊन आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोकांना मेटलच्या छोट्या बॉक्स असलेल्या खोलीत २ आठवडे ठेवले जात आहे. त्यामध्ये बेड आणि टॉयलेटची सुविधा देण्यात आली आहे. खुद्द चीनी माध्यमांनी याचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये Shijiazhuang प्रांतातील १०८ एकरमध्ये बनवलेल्या क्वारंटाईन कॅम्पसमध्ये हजारो लोकांना कशाप्रकारे ठेवण्यात आले आहे, हे दाखवले आहे. हे कॅम्पस जानेवारी २०२१मध्ये पहिल्यांदा केले गेले होते.

 

 

Team Global News Marathi: