लोकांचे प्राण अश्रूंनी नव्हे, ऑक्सिजनमुळे वाचले असते! राहुल गांधी यांची साधला मोदी सरकारवर निशाणा |

 

नवी दिल्ली | देशात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक वृत्तपत्रांनी तसेच विरोधकांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. तसेचच काँग्रेस नीट आणि खासदार राहुल गांधी सतत ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारवर विविध मुद्द्यावरून टीका करताना दिसून आले होते. त्यातच आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष ऑक्सिजनच्या पुरवठय़ाकडे नव्हते, तर बंगालकडे होते. लोकांचे प्राण पंतप्रधानांच्या अश्रूंमुळे नव्हे तर ऑक्सिजनचा पुरवठा करून वाचवता येऊ शकले असते, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली.

कोरोना संसर्गाच्या व्यवस्थापनाच्या गोंधळावर बोट ठेवत राहुल यांनी ‘व्हाईट पेपर’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून वाचण्यासाठी देशाला मदत करणे हाच या ‘व्हाईट पेपर’मागील हेतू आहे. तिसऱया लाटेसाठी आपल्याला आधीपासूनच तयारी करावी लागेल. कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. सरकारला देशभरात गतीने लसीकरण मोहीम राबवावी लागेल.

कोरोना संसर्ग सातत्याने रूप बदलत आहे. तज्ञांनी दुसऱया लाटेचा आधीच इशारा दिला होता, मात्र त्यानंतरही केंद्र सरकार ढिम्म राहिले होते, असे राहुल यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. त्यांनी दुसऱया लाटेतील सरकारच्या चुका निदर्शनास आणून देत तिसऱया लाटेपासून वाचण्यासाठी केंद्र सरकारला काही सूचना ‘व्हाईट पेपर’मधून केल्या आहेत. आधीच्या चुका सुधारूनच तिसऱया लाटेशी लढता येऊ शकते, असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: