“भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत.”

 

शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या ईडी कोठडीत आहेत. राऊत यांनी ईडी कोठडीतून दैनिक सामनासाठी रोखठोक लिहीत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र आता राऊत यांनी ईडी कस्टडीतुन केलेल्या लिखानावारून राऊत यांनी जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा सवाल मनसेच्या वतीने विचारण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी मुंबईबाबत एक वादग्रस्त विधान केलं होत त्यानंतर त्यांना माफी देखील मागावी लागली. हाच धागा पकडून राऊत यांनी रोखठोकमधून कोश्यारींना इतिहासाची आठवण करून दिली. विशेष म्हणजे संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणी ईडी कस्टडीमध्ये आहेत. यावरूनच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

संदीप देशपांडे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात,”आज सामनामध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा सवालही यावेळी देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: