भोसरी जमीन घोटाळा प्रकरण, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी ईडी कार्यालयात दाखल

मुंबई |  भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा तत्कालीन सरकारमध्ये राजीनामा द्यावा लागलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आपल्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने मंदाकिनी खडसे यांच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते.

याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांच्यासोबत मंदाकिनी खडसे या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, १२ ऑक्टोबर रोजी सेशन कोर्टाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला. त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक होते की नाही हे आता पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: