भोंग्याच्या विषयामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे, हे एक ढोंग आहे

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदवरील भोंग्याचे मुद्द्यावरून मांडलेल्या भूमिकेमुळे एकचं वाद निर्माण झाला होता अशातच त्यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

या विरोधात अनेक मुस्लीम संघटनांनी आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध केलाआहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या हेतूने भोंग्याचे राजकारण केले जात आहे असा आरोप मविआचे नेते करत आहे. त्यामुळे राज्यात भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.

सध्या हिंदुत्वाच्या नावावर जो काही राजकीय भोंग्यांच्या विषय सुरु आहे, हे एक ढोंग आहे. हे ढोंग फार काळ चालणार नाही. यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. हिंदुत्वाविषयी लोकांच्यामध्ये शंका निर्माण होत आहेत. भोंग्यांच्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना आवाहन आहे की त्यांनी देशभरासाठी राष्ट्रीय धोरण निश्चित करावं. दिशानिर्देश द्या, कायदा करा सगळ्यात आधी या भोंगा बंदीची सुरुवात बिहारपासून सुरु करा, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: