‘भोंगा’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला! प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज !

 

मुंबई | ‘भोंगा’ या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचं लक्ष वेधले आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून, यावर आधारित कथेवर ‘भोंगा’ हा चित्रपट चित्रित करण्यात आला. ‘धर्मापेक्षा मोठं कोणी नाही, मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल’ अशा वृत्तीला दडपून टाकण्यासाठी सुरु असलेले गावकऱ्यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

‘भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे’ हा आशयघन विषय या ‘भोंगा’ चित्रपटातून ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट अमेय खोपकर, संदीप देशपांडे, आणि अमोल कागणे फिल्मस् प्रस्तुत असून, चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली आहे.

‘भोंगा’ चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. एका कुटुंबातील चिमुकल्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते, या भोवती चित्रपटाचे कथानक फिरते.

Team Global News Marathi: