भाजपासाठी ३० वर्षे काम केले, पण पक्षाने किड्या-मुंगीप्रमाणे बाजूला केले

 

मध्य प्रदेशमधील एका नेत्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा नेता पत्रकार परिषदेमध्ये ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. या नेत्याचं नाव राजकुमार धनौरा असं आहे. पक्षानं त्यांची हकालपट्टी केल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. धनौरा यांनी सांगितले की, मी गेल्या तीस वर्षांपासून पक्षासाठी काम करत होतो. मात्र मला किडा-मुंगीप्रमाणे पक्षातून बाजूला करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार धनौरा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर धनौरा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मी संघटनेसमोर म्हणणं मांडलं. अध्यक्ष बी. डी. शर्मा यांचीही भेट घेतली. जर काही चूक झाली असेल तर मी पक्षाची माफी मागतो, असेही सांगितले. मात्र त्यानंतरही माझ्यावर हा अन्याय करण्यात आला. ज्या पक्षासाठी मी ३० वर्षे मेहनत केली. माझ्यावर एक रुपयाचाही कलंक असेल तर सांगा.

तसेच पक्षाने मला ३० वर्षांच्या मेहनतीनंतरही एका मिनिटात किड्या-मुंगीप्रमाणे उचलून फेकून दिले. एवढं बोलून ते भावूक झाले आणि रडू लागले. सुरखी तेथील आमदारांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राजकुमार धनौरा यांच्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातीलभाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीडी शर्मा यांनी राजकुमार धनौरा याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे

Team Global News Marathi: