महाभारतातील जिहादवरून गदारोळ, शिवराज पाटील यांनी स्पष्टच सांगितले

 

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी भगवद्गीतेची तुलना जिहादसोबत केल्याचा दावा करत राजकीय वाद निर्माण झाला.गुरुवारी केलेल्या वक्तव्यावर शिवराज पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत विरोधक वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचे म्हटले. आपण उपस्थितांना काही प्रश्न विचारले होते, असेही त्यांनी म्हटले.

शिवराज पाटील यांनी म्हटले की, चांगल्या गोष्टींसाठी, माणसाच्या संरक्षणासाठी कोणी शस्त्र उचलले तर त्याला जिहाद म्हणता येणार नाही. महाभारतात दुर्योधनाने जे कृत्य केले त्याला जिहाद असे म्हणू शकता. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धापासून पळ न काढता त्याला सामोरे जाण्यास सांगितले. हा जिहाद नव्हता. लढाई, युद्ध सगळ्याच देशांमध्ये, धार्मिक ग्रंथात असल्याचे त्यांनी म्हटले.

जिहादबाबत बोलताना शिवराज पाटील यांनी म्हटले की, तुम्ही कुराण वाचले का? कुराणानुसार, देव एक आहे. त्याला रंगरुप, आकार नाही. ज्यू आणि ख्रिश्चनांमध्येदेखील असेच म्हटले जाते. हिंदूच्या जुन्या ग्रंथातही याबाबत नमूद करण्यात आल्याच त्यांनी म्हटले. लढाई, युद्ध सगळ्या देशांमध्ये आहे. महाभारत, रामायणात युद्ध आहे. पहिले महायुद्ध, दुसरं महायुद्ध झाले. युद्ध तुम्हाला काही प्रमाणात काही करावे लागते, असेही त्यांनी सांगितले.
वेळेप्रसंगी युद्ध करावेच लागते.

Team Global News Marathi: