भाजपकडून विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोतांना उमेदवारी

 

मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.सदाभाऊ खोत यांना पुन्हा विधान परिषदेवर भाजपकडून पाठवण्यात येणार आहे. दरम्यान सदाभाऊ खोत यांना संधी दिल्यास विधान परिषद निवडणूक होणार आहे. सदाभाऊ खोत आणि उमा खापरे आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांवर निवडणूक होणार आहे. येत्या २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून या निवडणुकीसाठी ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना संधी दिली आहे. दरम्यान सहावा उमेदवार उतरवल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने सहावा उमेदवार दिला आहे.यानंतर आता विधान परिषदेच्या जागेसाठी सहावी उमेदवार दिला आहे. यामुळे भाजपने दोन्ही निवडणुका चुरशीच्या ठरल्या आहेत. पाचव्या उमेदवारीवर प्रसाद लाड आहेत. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून विधान परिषदेच्या सहा जागेसाठी उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात येईल अशी चर्चा होती. परंतु त्यांना पक्षाने डावललं आहे. यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Team Global News Marathi: