भाजपच्या विरोधात लढाई सुरूच राहील; संजय राऊत स्पष्टच बोलले

 

उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांचा न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (P ते मागील तीन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब गटाचे (उद्धव ठाकरे गट ) प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाक यांची भेट घेणार आहेत.

संजय राऊत आज अगोदर फोर्टीज रुग्णालयात जाणार आहेत. येथे ते आरोग्य तपास करणार. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत, असे त्यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या भेटीमुळे येणाऱ्या काळात शिंदे-फडणवीस गटाशी दोन हात करण्याची रणनीती आखणायत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, तुरूंगातील दु:ख कुणाच्याही वाट्याला येऊ नये. तुरूंगात राहणे फारच कठिण असते, असेदेखील राऊत यांनी यावेळी सांगितले. यासोबतच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्यावर काय अन्याय झाला याची तक्रारच मोदी आणि शहांकडे करणार, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच राऊतांनी यावेळी फडणवीस यांच्या कामाचे कौतुकही केले. फडणवीस यांना येत्या दोन-तीन दिवसात मी भेटणार. लोकांची काही कामे आहेत. माझा भाऊ आमदार आहे. त्यांच्या मतदारसंघातील कामे आहेत. त्यामुळे मी फडणवीस यांची भेट घेणार आहे. राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. हे माझे निरीक्षण आहे. राज्याचे नेतृत्व फडणवीसच करत आहेत. ते अनुभवी नेते आहेत.

Team Global News Marathi: