राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 November 2022

वार – गुरुवार

10.11.2022

शुभाशुभ विचार- शुभ दिवस

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – रोहिणी.

चंद्र राशी – वृषभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- केशरी )

एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज तुमची मिळकत चांगली असेल. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा मनापासून प्रयत्न कराल.

वृषभ (शुभ रंग- निळा )

आज कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून आज होईल.

 

मिथुन ( शुभ रंग- मरून )

आज काटकसरी वृत्तिस थोडा लगाम घालावा लागेल. काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवडते घ्या प्रवासात तब्येत सांभाळा.

कर्क (शुभ रंग- आकाशी.)

एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठांकडून मान्य होतील. वास्तु, वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल.

 

सिंह (शुभ रंग- हिरवा )

तुमच्या कार्यक्षेत्रातील अतिव्यस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागेल. आज अतिवस्त दिवस.

कन्या ( शुभ रंग- लाल)

आज घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. ज्येष्ठ मंडळी सत्संगात रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करावे लागेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नना आज दैव नक्कीच अनुकूल असेल.

 

तूळ ( शुभ रंग- मरून) – Today’s Horoscope 10 November 2022

आपल्या कुवती बाहेर जबाबदारी स्वीकारू नका. जे काही कराल ते आपल्या तब्येतीस जपूनच करा. आज गोडबोल्या मंडळींपासून लांबच रहा. पत्नी सांगेल ते योग्यच असेल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल.

 

धनु- (शुभ रंग- सोनेरी)

नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील आज तुम्हाला काही जुन्या चुका निस्तराव्याच लागतील. आज जोडीदार जे मिळेल त्याला हो म्हणणे हिताचे राहील.

मकर ( शुभ रंग- राखाडी )

उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय आज तेजीत चालतील. कलाक्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील.

 

कुंभ (शुभ रंग – चंदेरी)

अत्यंत सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात कराल. आज तुम्ही गरजूंच्या कामी याल. आज गृहसौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात आज खेळीमेळीचे वातावरण असेल.

मीन -(शुभ रंग – क्रीम )

कार्यक्षेत्रात विरोधकांनाही आज चहा पाजूनच आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीच्या संधी चालून येतील. आलेली कुठलीही संधी वाया घालवू नका.

 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: