भाजपचा पोकळ आत्मविश्वास, दूध का दूध – पाणी का पाणी होईल – भास्कर जाधव

 

राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जवळपास २१० आमदारांचे मतदान पार पडले आहेत. यात महाविकास आघाडी कडून ६ तर भाजपकडून ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १० जागासाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. तासेच तिनी पक्षांनी आपले उमेदवार निवडणून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

अशातच आता दहाव्या जागी महाविकास आघाडीचा विजय होतो का ? भाजप बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी निवडणुक प्रक्रियेवर भाष्य केले आहे. मतदान प्रक्रिया आता संपत आली आहे. शिवसेना गटा – गटानं मतदान करत आहे ही गोष्ट खरी आहे. मागील वेळी काही उणिवा आमच्याकडून राहिल्या त्यामुळं भाजपचं फावलं आणि त्यांचा निवडून न येणारा उमेदवार ही निवडून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सर्व प्रक्रियेवर स्वतः लक्ष ठेऊन आहेत.

तसेच विधानपरिषदेसाठी मतदानाचा कोटा आता सांगण्यापेक्षा, चार तास राहिले आहेत. मतमोजणीत मतांचा कोटा किती आहे ते कळेल,असं भास्कर जाधव म्हणाले. मात्र सायंकाळी येणाऱ्या निकालानंतर भास्कर जाधव यांनी वर्तविले भाकीत ठाकरे ठरेल की खोटे हे येणाऱ्या काही तासातच समोर येणार आहे,

Team Global News Marathi: