अयोध्येच्या श्री राम मंदिरासाठी दान केलेले 22 कोटींचे चेक बाऊन्स

 

अयोध्येच्या राम मंदिराच्या निर्माणासाठी संपूर्ण हिंदुस्थानातून निधी उपलब्ध होत आहे. या निधी समर्पण मोहिमेवर देखरेख करणार्‍या टीमचा मोजणीचा तात्पुरता अहवाल समोर आला आहे. यानुसार, अयोध्येच्या श्री राम मंदिरासाठी देणगी दिलेल्यांपैकी सुमारे 22 कोटींचे अनेक चेक बाऊन्स झाले आहेत. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राबविलेल्या निधी समर्पण मोहिमेत आतापर्यंत एकूण 5457.94 कोटी रुपये जमा झाले आहेत.

मात्र, जिल्हानिहाय लेखापरीक्षण होणे बाकी असल्याने हि आकडेवारी अद्याप अंतिम नाही. सध्या, त्यामुळे आता हे बाऊन्स चेक वेगळे करून दुसरा अहवाल तयार केला जात आहे.

चेक बाऊन्स होण्याचे कारण या अहवालातूनच समोर येणार आहे. तांत्रिक कारणांमुळे बाऊन्स झालेले चेक बँक प्रशासनासोबत बैठक करून पुन्हा सादर केले जाणार आहेत. या अहवालानुसार कूपन आणि पावत्यांद्वारे 2253.97 कोटींचा निधी जमा झाला आहे. त्याचप्रमाणे, डिजिटल माध्यमातून SBI-PNB आणि BOB च्या बचत खात्यांमध्ये 2753.97 कोटी आणि सुमारे 450 कोटी जमा झाले आहेत. ट्रस्टच्या वतीने दहा, शंभर आणि एक हजाराची कूपन छापण्यात आली. याशिवाय यापेक्षा जास्त रकमेच्या पावत्या वापरण्यात आल्या.

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी तयार केलेल्या अहवालात दहा रुपयांच्या कूपनमधून 30.99 कोटी रुपये, शंभर रुपयांच्या कूपनमधून 372.48 कोटी, एक हजाराच्या कूपनमधून 225.46 कोटी आणि 1625.04 रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे एकूण रक्कम 2253.97 कोटी रक्कम जमा झाली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: