भाजपा नेते प्रवीण दरेकरांविरोधात तब्बल ९०४ पानी आरोपपत्र; वाढणार अडचणी

 

मुंबई |मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी भाजपा नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि इतर दोन आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात इतर दोघांच्या नावाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. प्रवीण दरेकरांविरोधात तब्बल ९०४ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या आरोपपत्रात प्रवीण दरेकर यांच्यासोबतच प्रवीण मर्गज आणि श्रीकांत कदम या दोघांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई बँक कथित मजूर प्रकरणात बेलार्ड पियर मेट्रोपोलिटन कोर्टात मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एकूण 904 पानी आरोपपत्रात तिन्ही आरोपींविरोधात विविध कलमा अंतर्गद आरोप दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकूण 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. त्यात 3 पोलीस अधिकारी, एक डेप्युटी कलेक्टर, काही शासकीय अधिकारी तर काही मुंबई बँकेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्या विरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Team Global News Marathi: