आमदार कांदेकडून शिंदेच्या अभिनंदनार्थ जाहिरात, यात्रा ठाकरे पिता-पुत्रांच्या फोटोने वाढली चर्चा

 

नाशिक | राज्याच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पॅड देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्यानंतर राज्यातील शिंदे समर्थकांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर या अनुषंगाने आमदार सुहास कांदे यांनी वृत्तपत्रांना शिंदे यांच्या अभिनंदनाच्या पानभर जाहिराती दिल्या. मात्र या जाहिरातींमध्ये उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचे फोटो असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नाट्य अखेर काल आश्चर्यकारक रित्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेचे नावावर शिक्कामोर्तब झाले. या घोषणेमुळे राज्यातील नागरिकांना एकप्रकारे धक्काच बसला. शिवाय एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी यशस्वी झाल्याचे दिसून आले. या घोषणेनंतर गुवाहाटीत असेलेले बंडखोर आमदारांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. याचबरोबर राज्यातील अनेक भागात शिंदे समर्थकांनी आनंद साजरा केला. यात नाशिकमधील अनके शिंदे समर्थकांनी रस्त्यावर येत फटाके फोडत विजयोत्सव साजरा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे हे देखील या गटात सामील होते. पहिल्या दिवसांपासून ते शेवटपर्यंत सुहास कांदे शिंदे यांच्यासोबत होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि बंडखोर आमदारांसह राज्यातील शिंदे समर्थकांनी एकच जल्लोष केला. यामध्ये आमदार सुहास कांदे यांनी नाशिकमधील वृत्तपत्रांना अभिनंदनपर जाहिरात दिल्या आहेत. या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो छापण्यात आले आहेत.

Team Global News Marathi: