भास्कर जाधव म्हणजे उद्धव ठाकरेंचे आयटम गर्ल

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र आणि उद्धव ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहे. या वादात आता भाजप नेत्याने उडी घेतली.संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून बोलताना प्रसाद लाड यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी भास्कर जाधव यांचे नाव आयटम गर्ल ठेवू. मी भास्कर जाधव यांचे भाषण ऐकले . ते खूप नाटक करतात,अशा शब्दात लाड यांनी त्यांच्यावर टीका केली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून एक आयटम साँग असतं. अगदी तशाच प्रकारे उद्धव ठाकरेंचे भास्कर जाधव हे आयटम गर्ल आहेत,असा टोला लाड यांनी लगावला.

तसेच इतकीच ताकद होती, तर उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांना मंत्री का केलं नाही? असा सवालही लाड यांनी उपस्थित केला. तर उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांचा बदला घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असा इशाराही लाड यांनी दिला आता या टीकेला उद्धव ठाकरे गट काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे

 

Team Global News Marathi: