“भास्कर जाधव म्हणजे कोकणातील दशावतारमधले नरकासूर” नितेश राणे यांची घणाघाती टीका |

 

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली होती. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून आघाडी सरकार आणि विरोधात बसलेले भाजपा आमनेसामने आल्याचं दिसून आलं. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरून भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षाचे १२ आमदारांचे निलंबन केले होते. १ वर्षासाठी हे निलंबन असणार आहे. याच निलंबनाच्या कारवाईवरून भाजपने घणाघाती टीका भास्कर जाधव यांच्यावर केली होती.

या निलंबनाच्या कारवाईवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, आमचे १२ आमदार सैनिकासारखे लढले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून त्यांचे निलंबन करण्यात आले. आम्ही कोकणातले आहोत, भास्कर जाधव कोकणातले आहेत, कोकणात दशावतार असतो. त्यात सोंगाड्या, नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या, नरकासूर आहे अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली.

तसेच तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत. या सरकारकडून काही अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावरून आमचे सहकारी लढले आहेत. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात. हा माणूस सोंगाड्या, नरकासूर आहे असं नितेश राणे म्हणाले.

Team Global News Marathi: