भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकावर दरोड्यासह खंडणीचा गुन्हा दाखल

 

घर खाली करण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता थेट घरात प्रवेश करून कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवकांसह सहा ते सातजणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुह्यात नवीन कलमांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दरोडा, खंडणी व विनयभंग आदी कलमे वाढविण्यात आली आहेत.

संभाजीनगर रोडवरील एका व्यक्तीने फिर्याद दिली होती. त्यानुसार नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभि बुलाखे व इतर चार ते पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या व्यक्तीच्या घरात 11 मार्च रोजी रात्री शिंदे, बुलाखे व इतरांनी प्रवेश करून घर खाली करण्यासाठी कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत घरातील सामानाची तोडफोड केली.

तसेच घर खाली करण्याच्या कारणासाठी 11 मार्च रोजी साडेआठच्या सुमारास शिंदे व इतरांनी त्यांना शिंदे यांच्या कार्यालयात बोलावून डांबून ठेवत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. शिंदे व इतरांनी यापूर्वीदेखील फोन करून व घराचे नुकसान करून त्यांना घर खाली करण्यासाठी त्रास दिला होता. या तक्रारीनुसार तोफखाना पोलिसांनी नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे नगरसेवक शिंदेंसह त्यांच्या साथीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Team Global News Marathi: