भारतीय जनता पक्षाचे मुंबईवर बेगडी प्रेम, अंबादास दानवे यांची टीका

 

नाशिक – अमित शाह गणपती दर्शनासाठी आलेत, परंतु मुंबईचं महत्व कमी कसं होईल? हे पाहिलं जात आहे. मुंबईवर भारतीय जनता पक्षाच बेगडी प्रेम आहे अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे.

ते आज माध्यमांशी बोलताना त्यांनी अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर टिका केली होती.त्याचसोबत सामना हे ज्वलंत विचारांचं वर्तमानपत्र आहे. त्याचे विचार महाराष्ट्रपुरते मर्यादित राहत नाहीत तर देशपातळीवर विचार जातात. ज्वलंत विचार वर्तमानपत्रातून व्यक्त करतात असंही म्हटलं आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत आलेत. परंतु मुंबईचं महत्व कसं कमी होईल? मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचं. मुंबईतील अनेक कार्यालयात अहमदाबादला नेले. याचा अर्थ मराठी माणूस, मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं महत्त्व वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु महाराष्ट्राने सातत्याने यावर मात केली आहे असं त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे नावांची यादी पाठवली होती. परंतु ती यादी राज्यपालांनी रद्द केली. त्यावर दानवेंनी टोला लगावला आहे. राज्यपालांकडे असणाऱ्या विषयांबाबत गेली २-३ वर्ष पाठपुरावा केला ते निर्णय आता राज्यपाल २-३ मिनिटांत घेतायेत. फार कार्यतत्परतेने निर्णय घेतले जात आहेत. राज्यपालांनी मागील सरकारने दिलेली १२ जणांची शिफारस यादी रद्द केली त्याबाबत निश्चित कायदेशीर भूमिका घेऊ असं त्यांनी म्हटलं

Team Global News Marathi: