“अजित पवारांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही”

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यावरून वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आहेत अशातच आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधलाच पण शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही चांगलेच सुनावले आहे.

“ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. मागच्याच्या मागच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की, शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही. मात्र हे सपशेल फेल ठरले आहे. आज अनेक शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही.”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे.यात शेतकरी, वीज तोडणी, तसेच कर्ज माफी अशा अनेक मुद्द्यांवर भाजप ठाकरे सरकारला घेरणार आहे. तसेच मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर उद्याचे अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.

Team Global News Marathi: