‘पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर.’; शिवसेनेच्या या मंत्र्यांनी दिली खुली ऑफर |

 

बीड | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या मुंडे भगिनींनी मुंबई येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून आपल्या मनातील खडखड व्यक्त केली होती. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी पंकजा मुंडे नाराज असल्याचं म्हणत गौप्यस्फोट केला होता. अशातच ठाकरे सरकारमधील गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे.

पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे आणि त्या जर शिवसेनेमध्ये आल्या तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचे स्वागत होईल आणि त्यांचा योग्य मानसन्मान हा आमचे नेते करतील, असं शंभुराजे देसाई म्हणाले. ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत. मला कधी वाटलं नाही, मला मंत्री करा संत्री करा. माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करू. प्रीतमताई मंत्री नाही झाल्या. मी ४५ वर्षांची आहे. कराड साहेब ६५ वर्षाचे आहे. मी त्यांचा अपमानित करणार नसल्याची प्रतिक्रिया पंकजा मुडेंनी भागवतांना मिळालेल्या मंत्रिपदावर दिली होती.

Team Global News Marathi: