शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मन मोठ नाहीये – नारायण राणे

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात भाजपा नेते आणि माजी उख्यमंत्री नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काल शपथ घेतली. नारायण राणे यांना महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. नारायण राणे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर जर्यभारातून शुभेच्छा देण्यात आल्या आहे. मात्र आद्यपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिलेल्या नाही.

याच पार्श्वभूमीवर आता राणे यांना विचारण्यात आले असताना ‘शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही’ अशी टिप्पणी नारायण राणे यांनी केली आहे. तसेच केंद्रात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नारायण राणे यांनी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत.

देशाचा जीडीपी कसा वाढेल तसंच देशातील तरुणांना रोजगार प्राप्त होण्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करेन, असं पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. आता राणे यांच्या टिपण्णीवेर शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: