बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, ३० पेक्षा अधिक जागा जिंकू – संजय राऊत

 

मुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न तापत आता बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही ३०च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आज मुंबई पत्रकार मध्यमनश संवाद साधताना त्यांनी बेळगाव महानगर पालिका निवडणुकीवे भाष्य केले होते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बेळगाव पोट निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांनी १ लाखाच्या वर मते मिळवली होती. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही ३०च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसं उत्साही वातावरण दिसतंय. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असं राऊत म्हणाले.

कर्नाटक सरकारचा कार्यकर्त्यांवर दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचं ठरवलं आहे. एकीकरणकरण समितीचे अध्यक्ष अॅड. दीपक दळवी असतील किंवा काही तरुण कार्यकर्ते असतील या सर्वजणांनी मेहनत घेतली आहे. या वेळेला बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षाने होत आहे. बहुमतामध्ये सत्ता असलेली महानगर पालिका द्वेषबुद्धीने बरखास्त करण्यात आली होती. भगवा झेंडा उतरवण्यात आला होता. अशी अनेक कृत्ये कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली होती, अशी टीका त्यांनी केली.

Team Global News Marathi: