बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचा सत्ताधाऱ्यांचा सरकारचा डाव,पंकजा मुंडे थेट पोहचल्या राज्यपालांकडे

मुंबई : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्यास रोख लावले आहे. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्याला जो न्याय आहे तो बीड जिल्ह्याला नाही हे दुदैव आहे अशा शब्दात माजी मंत्री आणि भाजपाच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आज बीड जिल्ह्यात सुरु असलेले राजकारण म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पात्रात म्हणतात की, बीड जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याची जबाबदारी शासनाच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची आहे. परंतु निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज बाद करणे तसेच संचालक मंडळाची रचना निवडणुकीनंतर पूर्ण होत नसल्यामुळे बँकेवर प्रशासक आणि नंतर प्रशासकीय मंडळ नेमणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय सह निबंधक यांच्यावर राजकीय दबाव टाकून निवडणूक रद्द करण्याचा डाव आखत आहेत असा आरो त्यांनी लावला आहे.

Team Global News Marathi: