सावधान ! पुण्यात दिवसभरात 661 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

ग्लोबल न्यूज : पुण्यात आज मंगळवारी (दि.23) दिवसभरात 661 नवे रुग्ण सापडले. तर 358 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. संथ गतीने रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पुन्हा एकदा एका दिवसात 600 चा टप्पा पार झाला आहे.

आज करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 201 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 398 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 98 हजार 953 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3201 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4834 रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आकडेवारी नुसार कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे कळकळीचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: