कुख्यात गुंड गजा मारणे याच्या मिरवणुकीच्या ताफ़्यातील ३०० गाड्यांनी टोल चुकवला, खंडणीचा गुन्हा दाखल

कुख्यात गुंड गजा मारणे यांची कारागृहाच्या बाहेरून काढण्यात आलेली मिरवणूक संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. खुनाच्या आरोपाखाली निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मारणे याच्या समर्थकांनी मोठ्या गाड्यांचा फौजफाटा घेऊन कारागृहाच्या दारातूनच त्याची जंगी मिरवणूक काढली होती.

त्यात पोलिसांनी आता गजा मारणे याच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे सध्या फरार असलेल्या गजा मारणेच्या अडचणीत आणखीनच भर पडणार आहे. तसेच या सगळ्या गाड्यांनी उर्से टोलनाक्यावर टोल भरला नव्हता. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत सर्व वाहने पुढे नेली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.

खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास ३०० गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.

Team Global News Marathi: