बाटुक’ हे नाविन्यपूर्ण प्रबोधन करणारे पुस्तक – डाॅ. बी.वाय .यादव

‘बाटुक’ हे नाविन्यपूर्ण प्रबोधन करणारे पुस्तक  – डाॅ. बी.वाय .यादव

आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींचं साहित्य म्हणजे ‘बाटुक’ –बी वाय. डॉ. यादव

बार्शी – पांगरी ता.बार्शी येथील प्रसिद्ध वक्ते तथा लेखक प्रा.विशाल गरड यांनी लिहिलेल्या ‘बाटुक’ या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात संपन्न झाले. सदर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.राजेंद्र राऊत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार राजा माने, सोनवणे कॉलेजचे अध्यक्ष संजीव सोनवणे आणि माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले होते.

  डॉ.यादव म्हणाले की बाटुक हे पुस्तक रोजच्या जीवनातले विषय मांडून त्यातून प्रबोधन करणारे एक नाविन्यपूर्ण पुस्तक आहे, पत्रकार राजा माने यांनी साहित्य आणि कला क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना आपण पाठबळ दिले पाहिजे असे मत मांडले. अध्यक्षीय समारोपात आ.राऊत यांनी विशाल गरड यांच्या साहित्य प्रवासाचे कौतुक करून त्यांच्या पुढील कलाकृतीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजीव सोनवणे, जयकुमार शितोळे, विश्वास बरबोले, सचिन वायकुळे, तात्या बोधे, शुभम मिसाळ, विशाल चिपडे आदींची मनोगते झाली.

सदर पुस्तकात माणुसकी, पर्यावरण, शेतकरी, राजकारण, समाजकारण, मैत्री, बेरोजगारी, संसार, वात्सल्य, अत्याचार, वृक्ष संवर्धन, प्राणी, आरोग्य, स्वच्छता, सण, रानमेवा आणि शिवविचार या व अशा अनेक विषयांवर लिहीलेले लेख आहेत. हे संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्या भोवतालच्या नानाविध विषयांचे आकलन होते. आजवर प्रा.गरड यांची हृदयांकित, रिंदगुड, मुलूखगिरी आणि व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय ही चार ते पुस्तके प्रकाशित असून बाटुक हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे.

बार्शीतील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कला आणि साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी प्रकाशन सोहळ्यास हजेरी लावली.  प्रास्ताविक खंडू डोईफोडे यांनी, सूत्रसंचालन आकांक्षा देशपांडे यांनी केले तर आभार गणेश गोडसे यांनी मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी हनुमंत हिप्परकर, शुभम मिसाळ, सुजित पवार, रुपेश गरड, योगीराज थोरात, सुभाष डोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: