शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश !

 

रत्नागिरी | रत्नागिरी जिल्ह्यात दापोली नगरपंचायच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांच्या कुटुंबियांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगडमध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश पार पडला. दापोलीत शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेचे काही महत्त्वाचे पदाधिकारी आमच्या पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांनी दिली आहे. निवडणुका होईपर्यंत असे पक्षीय अदलाबदल घडामोडी घडत राहतील हे निश्चित आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण तापलं आहे.

परवीन शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा न दिल्याने त्या तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेच्या आहेत. असे असले तरी कार्यकाळ संपल्यावर त्याही राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी परवीन शेख यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत परवीन शेख यांनी संचिता जोशी यांचा केवळ 11 मतांनी पराभव केला होता.

Team Global News Marathi: