बापरे : सोलापूर शहरात 338 तर ग्रामीण जिल्हयात आज 1111 कोरोना पाॅजिटिव्ह;दोन्हीकडे मिळून 40 जणांचा मृत्यु

बापरे : सोलापूर शहरात 338 तर ग्रामीण जिल्हयात आज 1111 कोरोना पाॅजिटिव्ह;दोन्हीकडे मिळून 40 जणांचा मृत्यु

सोलापूर:  सोलापूर शहर व  जिल्ह्यात  कोरोना ससर्ग झपाटयाने मोठया प्रमाणात वाढत आहे. बुधवार दिनांक 21 रोजी सोलापूर  ग्रामीण जिल्ह्यात उचांकी 1111 कोरोना पाॅजिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.तर आज 18 जणांचा मृत्यू झाला आहे.तर शहरात ही 22जणांचा मृत्यू झाला असून 338 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

सोलापूर जिल्ह्य़ात आज अखेर 61 हजार 221 रूग्ण झालेले असून आज सोलापूर जिल्ह्यात 1111 कोरोना पाॅजिटिव्ह आढळून आले आहेत तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या जिल्ह्यामध्ये कोरोना पाॅजिटिव्ह रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.त्यामुळे नांगरीकांनी प्रशासनास सहकार्य करून मास्क आणि सोशल डिस्टन्सीग चे पालन करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील तालुकावाईज कोरोना पाॅजिटिव्ह रूग्ण आणी कंसात मृतांची संखया खालील प्रमाणे माळशिरस – 232 (02) , पंढरपूर – 212 ( 05 )  , मंगळवेढा – 34 ( 05)  , सांगोला – 59 ( 00)  , माढा -155  (03) , करमाळा – 125(00)  , अक्कलकोट -18 (01) , बाशीॅ – 126( 02)  , मोहोळ – 64 (03), दक्षिण सोलापूर – 18(00)   उत्तर सोलापूर – 68 (00)

सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज  पुन्हा एकदा, एकाच दिवशी कोरोनाने तब्बल 22 जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर शहरात आज बुधवारी दि.21 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 338 रुग्ण आढळले असून यामध्ये 202 पुरुष तर 136 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 2535 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 2197 निगेटीव्ह तर 338 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 332 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

कोरोनामुळे आज 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: