बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे गट पाडणार खिंडार

 

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे. तर शिंदे गटाला दिवसेंदिवस अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेतीलच नव्हे तर अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील होत आहेत.

शिवसेनेतील ४० आमदारांनी तसेच १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंना पाठींबा देणे हे ठाकरे गटासाठी खूप मोठा धक्का आहे. पण आता या धक्क्यातून ठाकरे गट सावरत असून १२ खासदारांना जागा दाखवण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. या बाराही खासदारांच्या मतदारसंघात तगडा उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

शिंदे गटात गेलेल्या या १२ खासदारांच्या मतदारसंघात लोकसभा उमेदवारांची ठाकरे गटाकडून चाचपणी करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, यवतमाळ – वाशिम मतदार संघात ठाकरे गटाने तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. पक्ष सोडून गेलेल्या बाराही खासदारांच्या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून तगडा उमेदवाराचा शोध सुरू असल्यामुळे हे सर्व खासदार अडचणीत येऊ शकतात.

बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात पर्यायी उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाच्या बाराही मतदारसंघात बैठका सुरू आहेत. या बैठकांमधून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीने एकत्र लोकसभा लढल्यास विद्यमान शिवसेना खासदारांच्या जागांवर ठाकरे गट दावा करणार असल्यामुळे ठाकरे गटाला आघाडीत या जागा मिळाल्यास १२ बंडखोर खासदार अडचणीत येऊ शकतात.

Team Global News Marathi: